शशीभाऊ,
मलाही प्रचंड आवडला दापोली परिसर. दोन वर्षांपूर्वी गेलो होतो. प्रत्यक्षात मुर्डी पाहायचा योग नाही आला, पण जवळच कड्यावरचा गणपती पाहिला. शिवाय आसूदबाग, हर्णै वगैरे ठिकाणं. कर्दे राहिलं. आसूदबागचा केशवराज मला अतिशय आवडला. अतिशय शांत, निवांत ठिकाण.
असो. कोकणातल्या दिवसांची आठवण आली. अजून लिहा की तुमच्या आठवणींविषयी!