दादरला राहात असल्यामुळे, जुहू वरून प्रभादेवी पर्यंत अनवाणी पायी चालत जाउन अफाट भक्ती प्रदर्शनाचे सौभाग्य कधी नशिबी आले नाही. पुर्वी आम्ही पण (म्हणजे सौ आणि स्वतः) एक अर्धा तास वाट पाहून दर्शनाला उभे राहु. गेल्या वेळेला दूरून "फास्ट ट्रॅक" दर्शनानेच आपली संतुष्टी करून घेतली. आता कित्येक वर्षं झाली, मी दर्शनाला गेलो नाही. बाप्पांवरची श्रद्धा कमी नाही झाली, पण परत तिथे जाण्याची इच्छाच झाली नाही.

                हा बाजार आप्ल्याला बंद करता येणार नाही. पण स्वतःला या बाजारातून वेगळे करणे हे तरी आप्ल्याच हाती आहे. मला नाही वाटत बाप्पांना माझी किंवा माझ्या "रिसाइकल्ड" नैवैद्याची कमतर्ता भासत असेल. वेगवेगळ्या लोकांची श्रद्धा  वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होते. जेव्हां वस्तुस्थिती आप्ल्या श्रद्धे अनुकुल नसते तेव्हा देवळात जाउनही काही उपयोग नसतो. आता तरी मी कुठल्याही देवळात किंवा तीर्थस्थानी फार तर एक वेळॅस खेप घालतो, ते देखिल फक्त होम मिनीस्ट्री शांत राहावी म्हणुन. जेव्हडे जास्त प्रसिद्ध तीर्थस्थान तेव्हडेच जास्त मोठा बाजार आणि जास्त येणारी तिडक (कोंकणी). ह्याला फक्त एक अपवाद : अम्रुतसरचे स्वर्ण मंदिर, जिथे मी कित्येक संध्याकाळी मनसोक्तपणे भक्तीचा आस्वाद घेत घेत रात्री पर्यंत बसून राहिलो.