अडलेले शब्द -
नट (nut) - मला एका शब्दात कसे सांगता येईल? कठीण कवचाचे फळ असे नको.
पॅटर्न (pattern) - मराठीत काय म्हणायचे? उदा. बिहेविअरल पॅटर्न, बदलांचा 'पॅटर्न' इ.
होस्टाइल (hostile) - सहसा परीसरशास्त्रात हा शब्द सजीव सृष्टीला घातक अशा अर्थाचे विशेषण म्हणून येतो. याला नुसते 'घातक' म्हणावे का?
हेरिडिटी (heredity) - सजीवाचे गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होणे. म्हणजे आंब्याच्या झाडाला येणाऱ्या बीतून आंब्याचेच झाड येणे. पांढऱ्या अस्वलाचे पिल्लू पुढे पांढरेच होणे!
पेलीअंटॉलोजी (paleontology) - जीवाश्मांच्या अभ्यासाची शाखा. 'जीवाश्मशास्त्र' म्हणावे का?
इन्स्टिंक्ट (instinct) - 'स्वभाव' असा एक शब्द सुचतो आहे. पण तितका योग्य वाटत नाही.