marathishabda.com हे कोजळ (वेबसाईट) ज्यांना नवीन मराठी शब्द तयार करायला आवडतात त्यांच्या साठी आहे.
नवीन मराठी शब्द निर्मीती हा एक नुसताच छंद नसुन भाषेचा एक गंभीर अभ्यास व अवघड कला आहे. त्यात भाषेच्या विविध घडणींचा, व्याकरणाचा, सामाजिक जाणीवेचा, लोकांच्या स्पंदनांचा, आधुनिकतेचा, सर्वसमावेशक विचार करणे गरजेचे बनते.
त्यामुळे कुठलाही व्यावसायीक हेतु न ठेऊन, हे कोजळ अशा भाषाप्रेमींसाठी निर्मिले आहे की, ज्यांना हे असे करावेसे खुप दिवसांपासुन मनात होते; ज्यांना चुकीचे, उगीचच अवघड असलेले, शब्द वापरतांना खूप यातना होतात अशांसाठी आहे. फक्त एक भाषाप्रेमी ह्या नात्याने "एकत्र" येणाय़्रांसाठी आहे. मराठीचे अभ्यासक, शिक्षक, प्राध्यापक, साहित्यीक, विद्यार्थी, संस्था, प्रकाशक, भाषाप्रेमी, सर्व प्रकारांची मराठी बोलणारे, कलाकार, सर्वांसाठी आहे.