मिश्र वाक्याची रचना करताना आधी गौण वाक्य आणि नंतर प्रधान वाक्य असणे हे मराठी वाक्यरचनेचे वैशिष्ट्य आहे. इंग्रजी किवा हिंदीत याच्या बरोब्बर उलट मांडणी असते.  त्यामुळे वरील लेखात आलेली अनेक वाक्ये मराठी व्याकरणदृष्ट्या योग्य नाहीत. उदाहरणार्थ :-मराठी शब्द असा की ज्याला मराठी व्याकरणाचे सर्व नियम लागू होतात. हे वाक्य 'ज्याला मराठी व्याकरणाचे सर्व नियम लागू होतात असा शब्द (क्रियापद? )' असे हवे.