मी मराठी भाषातज्ज्ञ नाही व माझा मराठीचा अभ्यास १० वीच्या मराठीच्या परीक्षेनंतर पूर्णपणे थांबला. नंतरच्या २५ वर्षात मी कधीही मराठीत लिहिले नाही, त्यामुळे माझे मराठी शुद्धलेखन, माझे अक्षर (की ज्याबद्दल मला अभिमान होता) ह्याचा पूर्णपणे ऱ्हास झाला.
ह्यातून तुमचा प्रामाणिकपणा दिसतो. संपूर्ण लेख आपण अतिशय विनयाने लिहिला आहे हे कौतुकास्पद आहे. आपण अधिक खोलवर जाऊन व्याकरणाची आणि शुद्धलेखनाची विविध उपलब्ध पुस्तके (काही आंतर्जालावरही मिळतील) वाचून त्याआधारे जर काही लेखन केले तर ते अधिक अवलंबनीय होईल आणि सगळ्यांनाच त्याकडे संदर्भ म्हणून पाहता येईल आणि तसे झाले तर आपली तळमळ फळास येईल असे मला वाटते.
आपल्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा.