लेख खूप छान आहे, सवडीने नीट वाचायला हवा. तरीसुद्धा लेखातले पहिलेच वाक्य--'कोणतीही भाषा त्यातील स्वर व व्यंजने ह्यापासून तयार झालेल्या शब्दांमुळे...' खटकले.  स्वर आणि व्यंजने यापासून अक्षर किंवा सिलबल बनते, शब्द नाही. एका अक्षराने किंवा एकाहून अधिक अक्षरे एकापुढे एक आली की शब्द बनतो. अशा शब्दाला अर्थ असेलच असे नाही. अर्थ असलाच तर त्याला 'अर्थपूर्ण शब्द' म्हणावे, असे मला वाटते. 

माझ्या माहितीप्रमाणे "आप" ह्या शब्दाचा अर्थ पावसाच्या थेंबाच्या ढगांपासून पृथ्वी पर्यंत पोहोचण्याच्या मधल्या स्थितीसाठी वापरला जाऊ शकतो. त्यानंतर त्याचे "पाणी" होते. हे शब्द समृद्धीचे एक उदाहरण. 

'अप्' या वैदिक शब्दाचा अर्थ हवा, पाणी, आकाश, अंतराळ, जलसमूह, कन्या रास इत्यादी होतो हे खरे, पण असे असणे हे शब्दसमृद्धीचे उदाहरण कसे होईल?