तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. 

कदाचित माझ्या भाषेकडे सर्वसंभाषणाचे साधन म्हणून पाहण्याच्या द्रॄष्टीकोनामुळे तसे झाले असावे. 
आपण ज्याप्रमाणे १२व्या/ १६ व्या/ १९ व्या शतकातील मराठी भाषा आज बोलत/लिहीत नाही, त्याप्रमाणे आणखी ५० वर्षांनी बोलली/लिहीलेली मराठी आजच्या पेक्षा खूपच वेगळी असेल. ह्याचे कारण म्हणजे भाषा ही पाण्यासारखी प्रवाही असते, त्यात नवनवे प्रयोग करुन ती आपण अधिकाधिक चपखल करतो. त्यात आपण बांध घालायचा प्रयत्न केला की, पाणी त्याची जशी वाट शोधते, तशी भाषाही शोधते. त्यामुळेच भाषाशास्त्रद्न्यानी त्या पाण्याला नवीन वाटा निर्माण करून द्याव्यात असे वाटते.