असंभव मी बघत नाही पण घरचे मधल्या जाहिराती सुद्धा बघतात. त्यामुळे आमच्याकडून टि आर पी ला पूर्ण सहकार्य आहे.

अभिनय सर्वांचाच उत्तम पण कथेत शून्य दम आहे. आयुष्यात काहीही उद्दिष्ट नसल्यासारखे किंवा नसल्यामुळे एकमेकांच्या जिवावर उठलेले लोक. आपल्या दैनंदिन गोष्टींशी कधीच मेळ न बसणाऱ्या घटना ह्यात घडत असतात. कोणतीही मालिका घ्या कथानकं, घटना, पात्रं वेगवेगळी असली तरी गाभा तोच.

 इतर दैनंदिन साबणांप्रमाणे (डेली सोप) ही मालिका पण तशीच. दामिनी ते कुलवधू सगळे सारखेच. प्रेक्षकांना आवडलं म्हणून (आवडलं जरा जास्त आहे, प्रेक्षक बघतात म्हणून असं म्हणायला पाहिजे)  रबरासारखं किंवा च्युइंग गम सारखं ताणत बसणारे.

एव्हढंच काय इ टी व्ही मराठी वर आणि हिंदी चॅनल्स वर तरी दुसरं काय चाललंय? सगळे एकाच माळेचे मणी. कथानक वेगळं म्हणजे बाकी सगळ जमून येत नाही. कधीच येणार नाही बहुधा.