मला वाटते काहीतरी गैरसमज होतो आहे.  मी स्पष्ट लिहिले होते की..."एका अक्षराने किंवा एकाहून अधिक अक्षरे..." . म्हणजे  शब्द एकाक्षरी असू शकतात किआ अनेकाक्षरी. 'तू, व, तो, ही' च नव्हे तर 'न्', 'स्', 'आ' 'ई' हेही (अर्थपूर्ण)शब्द आहेत. शब्द अक्षराचा किंवा अक्षरांचा बनतो; अक्षर हे स्वरा(स्वरां)पासून, स्वररहित व्यंजना(नां)पासून किंवा स्वर-व्यंजन(ने) यांच्या संयोगाने बनते. लेखातल्या व्याख्येनुसार पाहिले, तर स्वर आणि व्यंजन यांच्या संयोगाने फक्त एकाक्षरी शब्द बनतील, उरलेल्यांचे काय?