व्याख्या "मराठी स्वर व व्यंजने", "मराठी व्याकरण", "अर्थपूर्ण रचना", "सर्व-संभाषण" अशा मुख्य चार सुत्रांना गुंफते. वरील चारही सुत्रे एकमेकांत विणली तरच ६व्या व्याख्येचा अपेक्षित अर्थ आपल्याला "मराठी शब्द" कशास म्हणता येईल ते सांगतो.
त्यामुळे कृपया आपण शब्दांच्या व्याख्येकरता, ह्यासुत्रांचा एकत्रितपणे विचार करावा. तुम्हाला अभिप्रेत असलेली त्रुटी त्यानंतरही जर दूर होत नसेल तर, लेखातीन व्याख्येत काय सुधारणा केली असता ती परिपूर्ण होईल ह्याचे मार्गदर्शन केल्यास आभारी असेन.
ह्याकोजळावर हा लेख मी बराच उशीरा दिला आहे; त्यापुर्वी तो माझ्या कोजळावर काही महिने होता. पण मला माझे विचार तुमच्यासर्वांपर्यंत लवकर पोहोचवून [माझ्या कोजळावर येऊन तो वाचण्याची वाट न पाहता], माझे विचार सगळ्याच्या कसोटीला उतरतात की नाही हे पाहायचे आहे. ह्याविचारात काही सुधारणा हवी असल्यास ती करायचीच आहे तरच ह्या लेखाचा उपयोग. त्याकरता, आपण आपले विचार अधिक विस्तृतपणे मांडलेत तर मला ते मदत करतील. धन्यवाद तुमच्या वेळेबद्दल.