आप हा शब्द पावसाच्या थेंबांपासून बनलेल्या ढगांपासून ते पाणी पृथ्वीवर पोचण्याच्या मधल्या स्थितीसाठीसाठी वापरला जाऊ शकतो, हे शब्दसमृद्धीचे उदाहरण आहे की आशयाच्या भोंगळपणाचे? नेमकेपणा नसण्याचे?

तसे पाहिले तर 'आवड' हा शब्द आस, आसक्ती, आस्वाद, (उत्कट)इच्छा, ओढ, ओढा, ओघ, कल, कोड, खुशी, खोड, गती, गोडी, चव, चट, चटक, चहा, छंद, झोक, झुकाव, दिलचस्पी, धाव, ध्यास, नाद, निष्ठा, पसंती, (सहज)प्रवृत्ती, भक्ती, मजा, मनोवृत्ती, मन:प्रवृत्ती, मैत्री, मोह, मौज, मर्जी, रस, रुची, लज्जत, लाड, वृत्ती, वेड, व्यसन, शौक, सख्यभाव, सुख, सोस, संतोष, स्वारस्य, श्रद्धा, हवाहवासा, हौस, इ.इ. अर्थाने वापरला जात असेल तर ते अर्थसमृद्धीचे लक्षण नाही?