"आवड"साठी इतके शब्द आहेत व ते आपल्या लिहीण्या-वाचण्या-बोलण्यातही येतात, पण त्यांची ही एकत्रीत जंत्री पाहून मन थक्क होते. मी विचार करत होतो की ह्यातील कोणते ५ शब्द खालील वाक्यांमधे चपखल बसतील पण इतक्यात जमले नाही. तसेच ह्याबाबत काही नियम असतील तर कृपया विस्तृतपणे द्यावेत ही विनंती. 

"त्याला गणिताची आवड जरा कमीच आहे"

"त्याला गणित आवडते"

"त्याला गणित बरेच आवडते"

"त्याला गणित खूप आवडते"

"गणित म्हणजे त्याचा अत्यंत आवडीचा विषय."