दुवा देण्यासंबंधीची भाषा थोडी मोघम होती, आणि तो प्रतिसाद नेमक्या माझ्या प्रतिसादालगत उमटला होता म्हणून माझा गैरसमज झाला. त्या दुव्यावरील चर्चेत, शब्द मराठी आहे की नाही ते ओळखण्याची रीत एका वाक्यात दिली आहे. नामासारख्या शब्दांचे प्रत्ययापूर्वी सामान्यरूप होत असेल तर तो शब्द मराठी समजावा.  अशा शब्दांची अनेकवचने मराठी व्याकरणानुसार होतात. पण हा नियम परभाषेतून आलेल्या नामांपुरता मर्यादित आहे. मराठीत तर क्रियापदांचीदेखील सामान्यरूपे होतात. नमुन्यादाखल, केले पासून केल्या(ने/सारखे).

एखाद्या मूळ अमराठी विशेषणाला 'पणा' सारखा प्रत्यय लावून जर भाववाचक नाम बनत असेल तर तो शब्द मराठी समजावा. उदाहरणार्थ, उमदा पासून उमदेपणा, क्रॅक पासून क्रॅकपणा.