एकतर मी माझं दोन रुपयांचं पेनसुद्धा हरवलं, तरी अस्वस्थ होतो.

अगदी बरोबर.

ह्या गोष्टीवरून झालेली एक आठवण.

मुंबईत नोकरी करताना मला सर्वेक्षणासाठी निरनिराळ्या औद्योगिक वसाहतींतून आणि पोस्ट ऑफिसांतून (फोनबीन करायला) फिरावे लागे. ह्या सर्व धांदलीत माझी अशीच एक छत्री साकीनाका पोस्ट ऑफीस, विक्रोळीतील उपाहारगृह, कुर्ला अंधेरी बस वगैरे निरनिराळ्या ४ ते ५ ठिकाणी विसरून पुन्हा शोधायला गेल्यावर परत मिळाली होती!