ही त्रुटी निस्तरण्यावर काही विचार झालेला आहे परंतु समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. (आणि इतर अडचणींपुढे ही त्रुटी मागे पडली.)

उदा. मराठीत लिहिताना दिवसाच्या वेळा साधारण चार ते पाच ठिकाणी बदलतात असे दिसलेले आहे.

पहाटे, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री ... अश्या. हे बदल नक्की कोणत्या वेळी करायचे ते अद्याप नीट ठरवता आलेले नाही. एक विचार असा -

००:०० ते ५:५९:५९ पहाटे

६:०० ते ११:५९:५९ सकाळी

१२:०० ते १६:५९:५९ दुपारी

१७:०० ते १९:५९:५९ संध्याकाळी

२०:०० ते २३:५९:५९ रात्री

ह्यावर अधिक सुचवणी असतील तर कळवाव्या.