आपला लोकसंग्रह मोठा असल्यास आपण्च अशा चर्चा वेळोवेळी घडवून आणाव्यात असे मी सुचव्तो. एकदा जनमानसात विश्वासाचे स्थान निर्माण झाले की त्याने आणखी लोक प्रेरित होतील. मराठीचे प्राध्यापक, अभ्यासक, पत्रकार, विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी, भाषाविषयक चळवळींचे कार्यकर्ते, मराठी भाषेच्या प्रश्नांविषयी आस्था असणारे सर्वसामान्य नागरिक अशा स्र्व प्रकारच्या लोकांना अशा चर्चात (आणि नंतर कृतीत) रस वाटेल अशी मला खात्री आहे. मात्र ह्यात सातत्य असणे गरजेचे आहे. शिवाय ह्यातले नेते हे केवळ ह्या भाषेच्या प्रश्नावर लक्षकेंद्रित असायला हवेत असे मला वाटते.