मो. रा. वाळंब्याच्या पुस्तकातील उतारे आपण दिले आहेत.  त्यावरून अलंकाराचा नीट बोध होत नाही. उदाहरणार्थ -उपमा अलंकार होण्यासाठी, उपमान, उपमेय, साधर्म्य गुण, साधर्म्य दर्शक शब्द या साऱ्यंची अवशकता असते,  हे सांगायला हवे.

"तानाजी सिंहासारखा शूर होता. " या वाक्यात -

तानाजी - हे उपमेय

सिंह - हे उपमान

शूर - गुण साधर्म्य

सारखा - हा साधर्म्य दर्शक शब्द

हे सारे उपस्थित आहेत म्हणून हा उपमा अलंकार होतो.

इतका स्पष्ट खुलासा हवा.

रुपक अलंकारात उपमेय आणि उपमान यात अभेद वर्णिलेला असतो.

" तानाजी सिंहच होता"

'तानाजी' हे उपमेय आणि 'सिंह' हे उपमान यात भेद नाही; ते एकच!

इतके प्रत्येक अलंकाराबाबात सांगणे गरजेचे!!