मराठी भाषेत एखाद्या अकारात्न नामाचे सामान्यरूप साधारणपणे त्याला आकार जोडून केले जाते. उदा नळ - नळा, वाहन वाहना इ. आणि मग त्याला विभक्तीचा प्रत्यय लावला जातो असे वाटते. अलिकडे मराठी भाषेवर ( विशेषतः दूचिवा मालिकांमधून ) हिंदीचा प्रभाव खूप वाढला आहे त्यामुळे अकारांत शब्द हिंदीच्या धाटणीत तसेच वापरले जातात असे वाटते. उदा. सारेगमप मध्ये पल्लवी जोशी १ घर पुढे जा, २ घर पुढे जा असे म्हणते ते वास्तविक २ घरे, ३ घरे क्ष घरे असे असायला हवे. हिंदीमध्ये प्राणायामाबद्दल बोलताना प्राणायाम हा शब्द तसाच ठेवून फक्त के हा प्रत्यय लागत असल्यामुळे प्राणायाम के बारे मे असा उल्लेख केला जातो. भाषा कोणतीही जरी वापरली तरी ती शुद्ध स्वरूपात वापरावी ( तू सुनेगा तो तेरी बोबडी वळ जायेगी / पीपल आर कमिंग टु अवर हाऊस टु सी माय मुलगी टुमॉरो / मी त्याला / तिला ऐकलं हे सर्वच प्रकार विनोदी आहेत असं माझं व्यक्तिगत मत आहे. यात बोलीभाषा - लिखित भाषा असा मुद्दा कृपया काढू नये कारण संकेतस्थळांवर प्रामुख्याने लिखित संभाषणेच होतात असेही माझे मत आहे. कृपया तज्ज्ञांनी अधिक खुलासा करावा).
बाकी प्राणायामाची माहिती गुरूकडे जाऊन करून घेतल्यास ते उत्तम या वर लिहिलेल्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. सिद्ध समाधी योगाच्या अनेक विद्यार्थ्यांबद्दल ऐकून असले तरी मला स्वतःला त्यातले काही माहीत नाही त्यामुळे मी या बाबतीत काही मदत करू शकत नाही. सॉरी!
--अदिती