उत्कृष्ट व्यक्तिचित्रण आणि प्रवाही कथा, लेखनासाठी आपलं अभिनंदन!
आमदार निवासातून थेट धारावी झोपडपट्टी. का तर, तिथलं जगणं कसं असतं हे अनुभवण्यासाठी. कशासाठी हा अनुभव घ्यायचा, तर केवळ घ्यायचा म्हणून.
ही गोष्ट थोडी खटकली. म्हणजे नायकाची जी संपूर्ण पार्श्वभूमी तुम्ही उभी केलीये, त्याचं वाचन, त्याची बुद्धीमत्ता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याची तत्त्वज्ञानातली गती... हे सारं लक्षात घेता 'हा अनुभव केवळ घ्यायचा म्हणून' ही व्यक्ती घेणार नाही. जीवनाच्या काही अगदी मूलभूत प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात कदाचित तो धारावीत येऊन राहू शकतो. किंवा "त्यानंतर थेट बंगळूर. कशासाठी? काही नाही" असं एवढं कुठंचंही उद्देश्यहीन आयुष्य अचानक हा मनुष्य जगायला तयार होईल असं वाटत नाही. उलट त्याच्या फिलॉसॉफिकल क्वेस्टच्या पोटी हे सारं तो नक्की करेल असं वाटतं. म्हणजे कथा थोडी त्या अंगानं गेली असती तर ते जास्त सुसंगत झालं असतं असं वाटतं. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे आणि ते प्रत्येकालाच पटलं पाहिजे असं काही नाही. काही वर्षांपूर्वी गौतमची गोष्ट नावाचं अनिल दामलेंचं (बहुतेक) एक पुस्तक वाचलं होतं त्याची आठवण झाली.
तसंच तरीही कथेचा प्रवाहीपणा किंवा आपली शैली, दोन्ही निर्विवाद चांगली आहे यात शंकाच नाही.