मिलिंदराव,
अगदी रास्त शंका. माझ्याही मनातल्या. इथं जे लिहिलं आहे ते राजेंनी
दिलेल्या उत्तरापुरतंच मर्यादित आहे. त्याचा अर्थ असा नव्हे की, राजेंनी
ते तेवढ्यासाठीच केलं. माझ्या लेखनातून तसे सूचीत होत असल्यास तो दोष माझा
आहे. हा गृहस्थ असं काहीही करणार नाही याची मला स्वतःला पक्की खात्री
होती. म्हणूनच मी ते खोदकाम करायचा प्रयत्न केला होता, पण या
उत्तरांपलीकडं तो जायचाच नाही. आणि सत्य उत्तरं नसल्यानं मी तिथं
कल्पनाविलास करणं टाळलं. मला तो कल्पनाविलास करावासाच वाटलं नाही. कारण
त्या अर्थानं जीवनाविषयीचं राजेंचं आकलन खुद्द मलाच पूर्ण गवसलेलं नव्हतं
आणि नाहीही. आजही माझ्यापुढं हे प्रश्न कायम आहेत. नर्मदा किनाऱ्यावरील
पुजाऱ्याची त्यांनीच सांगितलेली कथा काय ती थोडी निर्देश करणारी ठरावी. पण
तिचाही राजेंच्या संदर्भातील अन्वयार्थ, "सिस्टमला मात देण्याच्या
प्रयत्नांतील अपयश" याच दिशेनं जातो आणि त्यांना केवळ तेच म्हणायचं होतं
का, हा प्रश्न कायम आहे.
राजे वास्तवात होते आणि त्यामुळं मी कल्पनाविलासाला वाव ठेवला नाही.
त्यांनी दिलेल्या अनुभवांचा विचार करता त्या कल्पनाविलासाची आवश्यकताच
नाही, हे तुम्हाला पटावं. त्यामुळं तुम्ही निदर्शनाला आणलेली कमकुवत ही
सर्वस्वी माझी, लेखकाची.
(असेही प्रतिसाद आले पाहिजेतच)
श्रावण