धन्यवाद, आपण लिहिलेली लेख मालिका वाचली. तेलाची समस्या रौद्ररुप धारण करणार हे नक्की. पण ह्यामधून उपाय शोधण्यासाठी किती प्रयत्न होत आहेत हे कळत नाही. जर पर्यायी उर्जा वापरात आली तर सध्या चालू असलेले अनेक उद्योग बंद होतील. पर्यायी उर्जेसाठी आवश्यक असलेली गुंतवणूक सहजा-सहजी हे उद्योगपती करणार नाहीत असच दिसून आले आहे. उदा. सरकार जुनी वाहाने वापरण्यावर बंदी घालते पण रिक्शा, टॅक्सी, ट्रक संघटना लगेच ह्याचा विरोध करतात, पर्यावरणाचा व समाजाचा विचार न करता.
फ्रांस मधील MDI कंपनीने हवेवर चालणारे मोटार इंजीन बनवले आहे. जगातल्या अनेक कंपन्यांनी त्यांच्याबरोबर संधी केली आहे. भारतातून TATA MOTORS ह्यांनी संधी केली आहे. ही मोटार क्रंती घडवू शकेल अशी आशा आहे.
महितीचा स्रोत: दुवा क्र. १
आपला,
सोंगाड्या