वाव -
प्रौढ व्यक्तीने दोन्ही हात क्षितिजसमांतर ठेवल्यास एका हाताच्या टोकापासून दुसऱ्या हाताच्या टोकापर्यंतच्या अंतराला 'वाव' म्हणतात. हे अंतर साधारण सहा फूट असते. केवढा मोठा नाग! चांगला वावभर लांब होता. अशा प्रकारच्या वाक्यरचना फार जुन्या नसलेल्या लिखाणातही आढळतात. वावचा अर्थ इंग्रजीत स्कोप असाही आहे. 'जागा आरामात' हे यासाठी घातले.
शोधसूत्र थोडे रंजक करण्याच्या प्रयत्नात -कदाचित निष्फळ- फाटकांनी फाटके घुसवली! इथे माझा रोख इलेक्ट्रॉनिक्स मधील ऑर-अँड गेटस् कडे होता.
छेडणे -
छेडणे ह्याचा अर्थ 'छेड काढणे' असाही आहे. ('कानाखाली आवाज'चे एवढे स्पष्टीकरण पुरेसे ठरावे!)
आणखी काही शब्दांबद्दल शंका असतील अवश्य विचाराव्यात. इथे किंवा व्यनिने, जे आपल्याला सोयीचे वाटेल त्याप्रमाणे.
-मीरा