मूळ गीत : "तेरे मेरे बीचमें कैसा है ये बंधन अंजाना"
चित्रपट : एक दूजे के लिये
१)पहिल्या कडव्यात
"रज्जू ओढत एक जणू
ओढून दुज्याला घेई
ऋजु धाग्याने त्या ऐसा
ओढला दुजा मग जाई"
ह्यात किंचित ओढाताण झाल्यासारखी वाटते.
'रज्जू ओढे एक, दुसरा धावल्यागत येई
ऋजू त्या धाग्याने जणू बांधल्यागत येई'
असे किंवा तत्सम काही केल्यास मूळ गीताच्या अधिक जवळ जाईल व वृताशी झटापटही कमी होईल.
२)"कंकण बांधून करी मी"
- कंकण बांधून खटकते. त्याऐवजी
'तुझ्याच हातांनी हिरवा चुडा मी भरीन
तुझ्याच अंगणी माप उलथून येईन'
कसे वाटते ?
३)"बोलण्या जरी मित्रांशी"
'इतनी जुबानें बोलें लोग, हमजोली' ह्या ओळीत 'हमजोली' हा शब्द नायिकेने नायकास संबोधण्यासाठी वापरला आहे. ती म्हणते आहे "अरे मित्रा, जगात लोक किती वेगवेगळ्या भाषा बोलतात. पण प्रेमाची भाषा एकच आहे - जी ज्योती व पतंग बोलतात. " तेव्हा
'बोलतात, मित्रा, किती जगी लोक भाषा' असे काहीसे भाषांतर हवे.