'रज्जू ओढे एक, दुसरा धावल्यागत येई
ऋजू त्या धाग्याने जणू बांधल्यागत येई'

असे किंवा तत्सम काही केल्यास मूळ गीताच्या अधिक जवळ जाईल व वृताशी झटापटही कमी होईल.

खरे आहे पण एकदा उद्धव वृत्त बरे वाटल्यामुळे पुढे सगळे गाणे त्यातच लिहिले. (हे कडवे सर्वात शेवटी लिहिले  )

 कंकण बांधून खटकते. त्याऐवजी
'तुझ्याच हातांनी हिरवा चुडा मी भरीन

का खटकते? तुझ्याचकडून मी कंकण बांधून घेईन हे बरोबर आहे की. ( कंकण बांधणे हा एक विधी लग्नात असतो. त्याचा हा उल्लेख आहे.)

हिरवा चुडा जास्त चांगला वाटला असता हे बरोबर. 

"बोलण्या जरी मित्रांशी"
.... हा शब्द नायिकेने नायकास संबोधण्यासाठी वापरला आहे.

अरेच्या! हे मला आधी कळले नाही. कृपया माफ करा.

मला वाटले कोण कोण बोलते त्याची ती जोडी/यादी आहे. (मी गाणे ऐकून आणि रोमन मध्ये वाचून भाषांतर केले). संबोधनाने जास्त चांगली ओळ झाली असती.

आपल्या कळकळीने वेळोवेळी करीत असलेल्या मार्गदर्शनासाठी आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद. असाच लोभ राहूदे