मीही स्पष्टच विचारणार आहे. तेव्हा चु. भू. दे. घे.
"चार दिवस इथे येणाऱ्यांनी इथल्या सिस्टीम्सना नावं ठेवणं गैर आहे" - का गैर आहे? आणि नेमके काय गैर आहे? आपण चारच दिवस येता हे गैर? म्हणजे २-३ महिने सुट्टीवर येणाऱ्यांनी असं म्हटलं तर चालेल; किंवा जे इथेच राहतात (आणि तरीही अशा विषयांबाबत तोंडाची वाफ दवडण्याशिवाय काही करीत नाही) त्यांनी म्हटलं तर चालेल! की "सिस्टीम्सना" नावं ठेवणं गैर? लोकांना ठेवा, चालीरितींना ठेवा.. पण "सिस्टीम्सना" नाही.
"मेलबर्नमध्ये बसून 'इंडियाला ब्यूटिफूल फॉर्मेशन अमिडस्ट केऑस' म्हणायचं हे ही फारच लाडिक लाडिक अन दांभिक वाटतं.. " - या विधानाच्या उत्तरार्धाशी मी सहमत आहे; पण "मेलबर्नमध्ये बसून" हे qualification कशाला? मुंबई - पुणे - हैदराबादेत बसून हे म्हटलं तरीही मला हे लाडिक अन दांभिकच वाटेल.