माननीय जोशीसो,

खरंतर मी हीच पद्धत वापरतो.( फक्त मी अधोरेखनाऐवजी ऊर्ध्वरेखन(Overscore) करतो इतकंच.!) विशेषतः चलध्वनीवरून लघुसंदेश पाठवताना. शक्यतो मी यासाठीदेखील देवनागरीच वापरतो पण गंतव्य चलध्वनीसंचावर देवनागरी लिपी दिसू शकत नसेल तर इंग्रजी लिपीतून मराठी लघुसंदेश पाठवतो.

काहीवेळा काही वैयक्तिक लिखाणांतदेखील असं करावं लागतं. साधारण माझी पद्धत अशी आहे.

क=k का= kaa  कि=ki  की=kee  कु=ku  कू=koo  के=ke  कै=kai  कौ=kau

ण= n (आणि त्यावर रेघ.) ळ= l (आणि त्यावर रेघ.)

श= sh  ष=sh(आणि त्यावर रेघ.)    द= d       ड = d(आणि त्यावर रेघ.)   त= t   ट=t(आणि त्यावर रेघ.)

क्ष= ksh (आणि sh वर रेघ.)  = ng(आणि त्यावर रेघ.) ........इत्यादि

हे मान्य की फक्त स्मॉल अक्षरे वापरल्यामुळे अक्षरांची लांबी जास्त होईल परंतु वाचताना मध्येच कॅपिटल अक्षर आल्याने कदाचित अडथळा आल्यासारखे वाटू शकेल पण ती अडचण नक्कीच नाही. माझ्या पद्धतीतील अजून एक त्रुटी म्हणजे ही पद्धत हस्तलेखनात वापरता येईल कारण संगणकात ऊर्ध्वरेखनाची सोय नाही, अधोरेखनाची सोय आहे. त्यामुळे तुमची पद्धत दोन्हीकडे उपयोजता येईल.

आता आपण मनोगतावर साधारण दोन्ही पद्धती वापरतो आहोत. "की" हे अक्षर kI  नेही टंकता येते व kii नेही टंकता येते. तसेच "का" आणि "कू" च्या बाबतीत.

सॉफ्टवेअर बनवताना ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित जर ध्यानात घेतल्या तर देवनागरी लिपीसाठी सॉफ्टवेअर्समध्ये एकसूत्रता येऊ शकते. आता कसं आहे, निरनिराळ्या सॉफ्टवेअर्समध्ये  एकाच देवनागरी अक्षरासाठी निरनिराळा कळसंयोग करावा लागतो. असो.

एका चांगल्या विषयाला हात घातल्याबद्दल आभारी आहे. आणखी प्रतिसाद येवोत ही सदिच्छा.

                                                                                                 -------------कृष्णकुमार द. जोशी