मिलिंद,
माफी मागायचा प्रश्नच नाही. आपण आपले विचार व्यक्त कधीही करू शकता.
तुमचं म्हणणं तरीही पटलं नाही. इथल्या सिस्टिमला सगळेच नावं ठेवतात आणि सगळेच त्याबाबत काहीही करत नाहीत. भारतात कायम वास्तव्य करणारे किंवा न करणारे. तरीही भारतातली सिस्टिम खराब आहे असं म्हणण्याचा उद्देश नव्हता. किंबहुना मी तसं कुठे म्हटल्याचं मला दिसत नाही.
मुंबईत वर्षभर राहणाऱ्याला ह्या गोष्टी कदाचित जाणवणारही नाहीत. पण बाहेरून आलेल्याला त्या आल्या आल्या खटकतातच. लिहिण्याचा उद्देश हा, की त्या गोष्टी खटकल्या तरी आठवड्या दोन आठवड्यातच बाहेरून येणारा माझ्यासारखा त्यात सामावून जातो आणि प्रत्येक गोष्ट त्या त्या जागी योग्य वाटायला लागते. आल्या आंल्या दिसणाऱ्या गोंधळाला जाईपर्यंत एक अर्थ मिळालेला असतो. ते फॉर्मेशन.
राहता राहिलं लाडिक लाडिक आणि दांभिक वाटण्याचं. माझ्या मते मी लिहिलंय ती सत्यपरिस्थिती आहे. कुणाला वाटत असेल की भारतात गोंधळ नाही किंवा फक्त गोंधळंच आहे, तर मी मतभिन्नता मान्य करतो. पण कोणत्याही प्रकारे सिस्टिम वर ताशेरे ओढण्याचा माझा प्रयत्न नव्हता.