जयश्री,
दीर्घ कालानंतरच्या ह्या पुनरागमनाचे मनापासून स्वागत!
गुलाबी चांदण्याची कल्पना भन्नाट आहे, मुखड्याच्या ओळीवरून 'रानारानात गेली बाई शीळ'ची आठवण होते.
आठवांचे सोनसळी, ऊन केशर केशर
तुझ्या वनात बसंती, मन मोहर मोहर
दिस भुलाव्याचे कसे, जाती छळत छळत
नादावले कशी बाई तुझ्या खेळात खेळात
--- ह्या ओळी मात्र खास जुन्या"जयश्री" शैलीतल्या!
आणखी येऊ द्या.
शुभेच्छा
जयन्ता५२