चारही अंगे हजर असतील तर ती पूर्णोपमा. गुणसाधर्म्य किंवा साधर्म्यदर्शक शब्द नसला तरी उपमा अलंकार होतो. अशा वेळी लुप्तोपमा अलंकार झाला असे म्हणतात. याशिवाय मालोपमा, रसनोपमा हे उपमेचे आणखी प्रकार आहेत.
यमकांमध्ये अंत्ययमक व चरणमध्ययमक असे दोन प्रकार आहेत. चरणमध्ययमकांत संयुतावृत्ती आणि असंयुतावृत्ती असे दोन उपप्रकार. दामयमक-पुष्पयमकांखेरीज संदष्टक यमक, अश्वधाटी यमक, नेत्रगोचर यमक हेही प्रकार आहेत.
अनुप्रासांमध्ये छेकानुप्रास, लाटानुप्रास, श्रुत्यनुप्रास आणि यांव्यतिरिक्त, वृत्यनुप्रासाचे तीन प्रकार आहेत.
हे सर्व तपशील सांगायचे म्हटले तर, लेखाच्या ऐवजी ग्रंथ लिहावा लागला असता; तेव्हा लेखात दिली आहे तेवढी माहिती पुरेशी आहे, असे वाटते.