श्री. नवीन यांनी शुद्ध मराठी रोमन लिपीतून कशी लिहावी यासाठी गोगट्यांच्या वेब साईटला भेट द्यायला सुचविले आहे. यथासमयी मी ते करीनाच! आज मी फक्त विशेषनामांसंबधात प्रस्ताव मांडत आहे. कारण मला मराठीची लिपी बदलण्याची इछा नाही. माझी देवनागरीवरची श्रद्धा अढळ आहे. प्रश्न विषेशनामांपुरता मर्यादित आहे.  इतर भाषिकांसाठी इंग्रजीत  लिहताना त्यांनी विशेषनामांचे विकृत उच्चारण करू नये, या साठी काय करता येईल, एवढच विषय मांडायचा आहे.