प्रदीप.... कधी कधी अशी घुसखोरीही करू द्यावी लागते हो....
अलबत् !
म्हणूनच तर मी प्रतिसादात म्हटले आहे ना की, तुम्ही त्या शब्दाला मोठ्या सन्मानाने प्रवेश दिला असेलही...
मला काय खटकले, ते मी सांगितले, इतकेच.
तुम्ही त्या 'घुसखोरा 'ची ताबडतोबीने 'हकालपट्टी ' करा, असे थोडेच म्हटले मी? :)
(आणि तसे सांगण्याचा मला काहीही अधिकार नाही, याची मला सार्थ जाणीव आहे.)
कवीने (कवयित्री आल्याच यात) निवडलेल्या शब्दांचा वाचकाने मान राखायला हवा. माझी गल्लत अशी झाली की, मी तुमची कविता वाचक या नात्याने न वाचता कवी या नात्याने वाचली.. :) :) :)
बऱ्यापैकी जमलेल्या पुलावात मला तो शब्द खड्यासारखा वाटला... कुणाला तो मसाल्यातल्या मिरीसारखा चवदारही लागेल... पसंद अपनी अपनी! :) [(आता मी मिरीला खडा म्हटले, असे कुणी म्हणू नये... :) ]
हे सारे लिहिताना तुमचा स्मायली मी लक्षात घेतलेला आहे. - - - [(येथे मीही, डोळा मिचकावणारा स्मायली टाकला आहे, असे समजावे :) ]