थोडेफार म्हणायचे आहे. लेख अत्यंत सुंदर आहे, आणि तो सविस्तर तर आहेच. पण काही ठिकाणी पुनरुक्ती झाली आहे, तसेच लिहीण्याच्या ओघात चमत्कारिक वाक्यरचना आलेल्या आहेत ('एकदा तारीख ३१ मे होती'). हे टाळले असते तर अजून छान वाटले असते. (टिप्पणी अशासाठी की लेखिका नवथर नाही, सकारात्मक टिका समजून घेईल अशी एकंदरीत खात्री तिच्या लिखाणावरून वाटते). पण खरे सांगायचे तर अजून थोडे संकलन करून, व आठवणींचा विस्तार करून ह्याचे दोन -तीन बहारदार लेख व्हावेत. (किशोर आरसांचे 'आठवणींच्या आठवणी' - मौज प्रकाशन ह्या संदर्भात आठवले). लेखिकेला पुढील लेखनाला मनापासून शुभेच्छा.