माझ्या एका जर्मन मैत्रिणीचं नाव Petra आहे. जेव्हा तिच्याशी ओळख झाली तेव्हा मी तिच्या नावाचा मराठी उच्चार केला. ती म्हणाली की माझा उच्चार चुकतोय. मी 'पे'चा उच्चार लहान करत होतो, तो मी थोडा लांब हवा होता. म्हणजे ऱ्हस्व 'पे'ऐवजी दीर्घ 'पे'... तसा उच्चार केल्यावर ती म्हणाली की उच्चार आता थोडा सुधारलाय पण हवा तसा नाहीये.
नंतर काही दिवसांनी काहीतरी विषय निघाला असता तिने सांगितलं की घोड्याला जर्मनमध्ये प्फेर्द (Pferd) म्हणतात. हा उच्चार मला अजूनही जमला नाहीये. कारण त्यातल्या 'र'चा उच्चार खूप अवघड वाटतो. दातांच्या दोन्ही ओळींत जीभ धरून 'र'चा जो उच्चार होईल तो योग्य आहे असं तिने मला सांगितलं.