वर दिलेला भाग हा नायिकेने म्हटलेला आहे.
नंतर नायकाने म्हटलेल्या भागाचे भाषांतर -

नायक :
माझ्या तुझ्यामधे कसले
अज्ञात बंध हे जुळले
कळले ना तुजला काही,
अन् मजही नाही कळले ।ध्रु।

रज्जू ओढत एक जणू
ओढून दुज्याला घेई
ऋजु धाग्याने त्या ऐसा
ओढला दुजा मग जाई
जणु वाटावे की त्याचे
भान तनमनाचे ढळले ।१।

डोळ्यांस नीज ना येई
लाभे न स्वस्थता मजला
हे सगळे थांबवण्याचा
मी यत्न कैकदा केला
पण माझ्या स्वप्नांत तुझे
येणे जाणे ना खळले ।२।

प्रशासक, कृपया हा भाग जोडावा, ध्रुवपद उघडावे आणि शीर्षक बदलावे ही विनंती.