प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद!!

अष्टावधानात एक, दिशावधान असण्याची शक्यता जास्त. कारण, स्थलावधान, काळावधान, प्रसंगावधान हे तर "कॉमन सेन्स"

नेच असावेतच. मतितार्थ अगदीच योग्य, पण तो ढोबळ अर्थाने. ८ भावातला अश्रू किंवा अश्रुपात आहेच. दोष मराठी टंकण्याची सवय कमी असल्याने झाला. क्षमस्व.

ही अवधाने " राजाच्या" प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमाचा एक भाग असावीत. याच अवधानांच्या  ज्ञानाच्या बळावर राजाचे अनुमान तो त्या विषयाच्या " विशेषज्ञाच्या" अनुमानाशी सुसंगत कि विसंगत ते     " पडतळुनच " तो अंतीम निर्णयाप्रत पोहोंचत असावा.

अवधानी राजांच्या कमतरतेमुळे सारेच अवधान मागे पडलेली असावित.

एखादा पौराणीक व्युत्पत्तीकोष याचा उलगडा करू शकेल.

ज्ञानाची तहान भागली नाही.