माझा एक पुतण्या गेली दहा वर्षे अमेरिकेत असतो, पण अजूनही तो उत्तम मराठी बोलतो. त्याच्या बोलण्यात सतत पु. लं. डोकावत असतात. अगदी नाश्त्याच्या टेबलवरही 'तुम्ही काही म्हणा उस्मानशेठ, सर्व धर्म सारखे.. आम्लेट! ' असे सुरू असते. नुकताच तो सुटी संपवून परत गेला. त्याच्या सुटीच्या वीस दिवसांत त्याची सगळ्यांना इतकी सवय झाली होती, की त्याच्या जाण्याच्या दिवशी आम्ही सगळेच अस्वस्थ झालो होतो. मी त्याचा निरोप घेतला आणि गाडी वळवून निघालो तेंव्हा  तो गॅलरीत उभा होता आणि कोपऱ्यावर मी मागे वळून पाहिले तेंव्हा तो हात उंचावून काहीशा रुद्ध आवाजात ओरडला, 'कशाला आला होता रे, बेळगावात?'