सतीश रावल्यांना मी सुचवलेला उपाय तडजोड वाटते. आद्वैतुल्लाखानांना हे कदापि शक्य नाही असे वाटते. चै त रे चैत च्या लेखकाचे ही मत जवळ जवळ तसेच आहे.
मराठी विशेषनामे उच्चारताना अ-मराठी माणसे चुका करतात. त्या विषयी आपाण बोलत आहोत. चुका दोन प्रकारे संभवतात. एक म्हणजे त्या परक्या माणसास मराठी शब्द उच्चारता येत नाही. जसे फ्रेंच शब्दा बाबत घडले; किंवा हिंदी भाषिकांना स ने सुरू होणारी जोडाक्षरे उच्चारता येत नाहीत- स्टेशनचा उच्चार ते सटेशन करतात ... वगैरे! हे प्रकरण प्रत्यक्ष भेटीतच दुरुस्त झाले तर झाले. खात्री नाहीच!
दुसरी चूक उच्चार आपण त्यांना नीट कळवू शकलो तर दुरुस्त होऊ शकते. विशेषतः भारतीय व्यक्तींच्या बाबतीत हे साध्य होऊ शकेल.
आपण मराठी परिघ ओलांडून इतर भारतीय भाषिंकांबरोबर संपर्क साधू लगलो, आणि त्या साठी इंग्रजी लिपीचा आश्रय घेऊ लागलो की अडचण येते. सर्व भारतीय भाषेत त थ द ध न / ट ठ ड ढ ण ही अक्षरे आहेत. सर्व भारतीय भाषा बारा/चौदाखडीचा वापर करतात. दक्षिणी भाषांत ळ देखील आहे. इंग्रजीत मात्र हे काहीच नाही!
हिंदी व मराठीची लिपी देवनागरी आहे. हिंदी संपर्क भाषा झाली असती (ते एक स्वप्नच राहिले!) तर काम अधिक सोपे झाले असते. आज हिंदीसह सार्व भाषा इंग्रजीचाच आधार घेतात. या स्थितीत या लोकांना मराठी विशेषनामे कळवावित म्हणून हा प्रयत्न! इंग्रजी Khed वरून घेताना खेद होऊ नये -इतकाच मर्यादित उद्देश!
शेवटी घोड्याला पाण्यापर्यंत नेण्याचा हा खटाटोप. कोणाचे उच्चार सुधारतील अथवा नाही याची हमी कोण घेणार?