माननीय अद्वैतुल्ला,
तुमच्या म्हणण्यात तथ्य असेलही, मी नाही म्हणत नाही. पण तुम्ही जे शेवटचे वाक्य लिहिले आहे त्यासाठीच ना हा लेखनप्रपंच? मग त्या विषयाला कुठंतरी आधार द्याल कि थेट " हे कदापिही शक्य नाही " म्हणून विषयच "कट्" करायचा? नाही हो! असं नका करू! आधार द्या असं मी एवढ्यासाठीच म्हणतोय की हा विषय काही अगदीच दुर्लक्षिण्यासारखा नाही. शेवटी कुठेतरी मराठी भाषेचाही आहे.
चुकीचं बोललो असेन तर क्षमा असावी.
.................कृष्णकुमार द. जोशी