योग्य लिखाण--मथितार्थ... मतितार्थ(x), मतिथार्त(x)मतिथार्थ(x)मथिथार्थ(x) नाही!

कथित, ग्रथित(ग्रंथित नाही!), प्रथित(=प्रसिद्ध)यश, मथित(=घुसळून मिळालेले), उपस्थिती, परिस्थिती, स्थिती वगैरे. हे सर्व शब्द संस्कृतमधील कर्मणी भूतकालवाचक धातुसाधिते आहेत. तसेच थातुरमातुर, थुत्, थुत्तर, थोतरी, थोतांड. 'थ' आधी आणि 'त' मागाहून.

परंतु तथा, तिथी, तेथे, तथ्य, अतिथी, तीर्थ, ताथैया ताथैया, इत्यादी शब्दांत 'त' अगोदर येतो आणि 'थ' नंतर.