मराठी विशेषनामे उच्चारताना अ-मराठी माणसे चुका करतात.  अ-मराठी नावे उच्चारताना मराठी माणसे चुका करतात. फिट्टंफाट!

हिंदी व मराठीची लिपी देवनागरी आहे. लिपी पूर्णपणे एक नाही. हिंदी क, ख, ग, ड, ढ, ही अक्षरे दोनदोन आहेत. चंद्रबिंदू नावाचा अर्धानुस्वार आहे. मराठीत हे काहीच नाही. याउलट मराठीत दोन च आणि दोन झ आहेत.  शिवाय एक ळ आहे. त्यामुळे लिपी एक असून आपल्याला हिंदी ढंगाने हिंदी बोलता येत नाही. इंग्रजी आणि फ्रेंच यांची लिपी एक आहे, म्हणून इंग्रजी जाणणारा, खास अभ्यासाशिवाय फ्रेंच उच्चार करू शकत नाही. तसेच हिंदी-मराठीचे.

हिंदी संपर्क भाषा झाली असती (ते एक स्वप्नच राहिले! )..कोण म्हणते, हिंदी संपर्क भाषा नाही?  आज भारतभर हिंडणारे  गावोगावच्या सामान्यांशी हिंदीच्या आधारावरच संभाषण करू शकतात.  यदाकदाचित हिंदी ही संपर्क भाषा नसली तरी, संपर्क बोली आहेच.