मूळात हि अशी अपभ्रन्शित आडनावे हि इंग्रजी / इंग्रजांच्या संपर्कातून सुरू झाली. उत्तर भारतात हि गुप्त चे गुप्ता मिश्र चे मिश्रा शुक्ल चे शुक्ला झाले. इंग्रजांच्या भारतीय भाषा शिकण्याच्या तर्हा निराळ्या होत्या. उदा. "दरवाजा बंद कर दे" हे वाक्य इंग्रज लोक "देअर वौज अ बेंकर डे (There was a banker day)" असे म्हणून करी सबब त्यांचे उच्चारण इंग्रजी तर्हेने होत असे. पुन्हा आपण मराठी भाषिक तर त्यंच्या साठी अधिकच उदार झालो होतो. इंग्रजी व्याकरणा सारखेच सन्स्कृत व्याकरण बनवून (टेलर मेड) घेतले गेले. उदा. प्रथम पुरुष एकवचन मुळ सन्स्कृत व्याकरणात स: असुनही आपण फक्त महाराष्ट्रात अहम असे करवून घेतले आहे.  कारण इंग्रजाना समजाविणे सोपे जावे. सर्व प्रथम महाराष्ट्रातील शाळेत सन्स्कृत विषयाचे अनुवादाची भाषा इंग्रजी होती. सन्स्कृत विषयाचे शिकविणे हि "गम / गच्छ = टु गो" अश्या तर्हेने प्रचलित होते. मात्र महाराष्ट्राबाहेर मात्र सन्स्कृत पारंपारिक स्वरुपातच शिकविले जात होते व आहे.