आपल्या सारखा ज्ञानविभुषीत वेत्ता मार्गदर्शक मला सहकार्य करतो आहे हे माझे भाग्य आहे. "स्वॉट" विश्लेषणाचा देखिल संदर्भ / मदत घेता येइल असेच वाटते. यात " स्व-बलावधान" सुद्धा असू शकते का? चाणक्याच्या किंवा चंद्रगुप्तासंबंधी पौराणीक ग्रंथावरून जास्त माहिती मिळण्याची शक्यता वाटते. सिकंदर किंवा पोरस / पुरू तसेच रामायण महाभारतात कुठे सुक्ष्म संदर्भ असण्याची शक्यता असावी. " रावणाच्या बालावबलाचे निरीक्षण करण्यासाठी श्रीराम पर्वतावर चढले होते... " असा गीतरामायणात उल्लेख अढळतो. म्हणजे स्वबलासोबतच , पर-अबलाचे अवधान सुद्धा असावे असा निष्कर्ष निघेल का? असेल तर अजून दोन अवधान सापडले म्हणावे का? व्यवधान म्हणजे नेमके काय? बलावबलावधान असे एकच अवधान घ्यावे की वेग-वेगळे ते तुम्ही सुचवू शकता.
मला असे देखील वाटते आहे की या संशोधनात एखादी हेरगीरी सारख्या व्यवसायातली मुरलेली म्हणजे तरबेज हेर प्रशिक्षक व्यक्ती सहाय्य करू शकेल. त्यांना, हे मुख्य सद्गुण असणारी व्यक्ती चांगलीच हेरता येते.
STRENGTHS WEAKNESS OPPORTUNITIES THREATS यावरून सुद्धा काही संदर्भ लागावा.
सैन्यातील "अतीविशीष्ट" अधीकार्यांसाठी US किंवा UNO "सामरीक रणनीती" STRATEGIC WARFARE चे पदव्युत्तर शिक्षण दिले जाते असे स्पष्ट ऐकिवात आहे. दरवर्षी केवळ ३ ते ५ जणच यात संपुर्ण पृथ्वीवर उत्तीर्ण होतात असेच ऐकले आहे. त्यांना देखील अशा ज्ञानाची नितांत अवश्यकता असाविच.
धोक्यांच्या अवधानाला एकच शब्द कोणता?
6TH SENSE, अतिंद्रिय ज्ञान एखाद्या अवधानात मोडण्याची शक्यता किती? अर्थावधान [ संपत्ती, धन, खर्च, व्यय ] एखादे अवधान असण्याची काही शक्यता?
सविस्तर निरसन झाले तरच बरे वाटेल....