न्याय निती अवधान सुद्धा असू शकते? "...... न्याय निती तो भरत जाणता, त्या भरताचा मी तर भ्राता" वालीवध ना खलनिर्दालन. सुक्ष्म संदर्भ म्हणूयात का? अनेक निती जसे रणनिती, सामनिती, दामनिती, दंडनिती, भेदनिती, चाणक्यनिती, विदूरनिती. मला वाटते , अष्टावधान हे "generalist"/ सर्वज्ञा चे मुख्य साधन / सूत्र असावे. आणि विशेषावधान हे विशेषज्ञाचे साधन सुत्र असावे. यात दशदिशा, बहूस्थल, बहूकाळ [त्रिकाळ / अष्टौ प्रहर], बहूप्रसंग, बहूनिती, ............. असा समावेष असावा ज्यायोगे राजाचे / सम्राटाचे बौद्धिक वर्चस्व चिरकाल अबाधीत राहत असेल. अस्त्र शस्त्रावधान हे बलावबलाचे घटक असावेत.
अष्टावधान हे विशेष संख्या सुचक नाम आहेच म्हणुनच विशेष घटक असणारच. असा माझा ठाम अभिप्राय आहे.