अदिती,

खरं तर मी 'गॉन विथ द विंड' हा चित्रपट पाहिलेला नाहीये. परंतु 'गॉन विथ द विंड' आणि त्याचा पुढचा भाग, 'स्कार्लेट' या दोन्ही कादंबरी(ऱ्या) वाचल्या आहेत. आणि मी त्यांची अगदी चाहती आहे.

स्कार्लेट ही व्यक्तिरेखाच अशी आहे की जी वाचकावर मोठा प्रभाव टाकून जाते. या व्यक्तीत सगळेच आदर्श गुण आहेत असे नाही, पण मला ती फार प्रेरणादायी वाटते. मला खूपदा, कमीत-कमी वाचत असताना तरी, तिच्यापासून बऱ्याचवेळा प्रेरणा मिळालीये किंवा माझ्यावर तिचा परिणाम नक्कीच झालाय! तुमच्या या लेखातून तिची आठवण करून दिल्याबद्दल आभार...

खिळवून टाकणारी स्कार्लेट सारखी दुसरी व्यक्तिरेखा आजवर माझ्या वाचनात आलेली नाही. शेवटी तिच्या गुणदोषांची चिकित्सा करत बसण्यापेक्षा पुस्तकातून एखाद्या भव्य शिल्पासारख्या साकार झालेल्या तिच्या त्रिमित रूपाकडेच पाहणं खरं महत्त्वाचं असं वाटायला लागतं.

या तुमचा मताला पूर्णतः सहमत!!