अनुप्रास
देवी दयावती दवडिसी दासची दुःख दुर्दशा दूर!
पापा ते पळवितसे तुझ्या कृपेचा पय:पूर!!
श्लेष
ती शीतलोपचारी जागी झाली, हळूच मग बोले,
औषध न लगे मजला , परिसुनी माता बरे म्हणोनी डोले!
(दमयंती मातेस सांगते आहे, मला 'नल' हेच औषध आहे, दुसरे औषध नको!)
यमक
केले पात्र सुवर्णाचे किं विरुपशी खापरी /
लाविता तेथ संहारी, तम दीप शिखापरी
(पात्र सोन्याचे असो की खापराची पणती असो दिव्याची ज्योत (दीपशिखा) अंधार (तम) नाहिसे करण्याचे काम चालूच ठेवते.)
येथे 'प शि खा प री' ही यमक अक्षरे आहेत.