राम दूध प्यायला
सीता दूध प्यायली
राम खीर प्यायला
सीता खीर प्यायली
राम रस प्यायला
सीता रस प्यायली
येथे (राम/सीता) कर्त्याप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलले (आणि कर्माप्रमाणे नाही) हा कर्तरी प्रयोग झाला.
रामाने दूध प्यायले
सीतेने दूध प्यायले
रामाने खीर प्यायली
सीतेने खीर प्यायली
रामाने रस प्यायला
सीतेने रस प्यायला
येथे (दूध/खीर/रस) कर्माप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलले (आणि कर्त्याप्रमाणे नाही) हा कर्मणी प्रयोग झाला.
असे मला वाटते. (चू. भू. द्या. घ्या.)