अली म्हणजे भुंगा. त्याचे वहन म्हणजे कमळ. कमळाचे वहन म्हणजे पाणी. (अलीच्या वहनाचे वहन म्हणजे) पाणी आणत होते.

शशीधर म्हणजे शंकर. त्याचे वहन म्हणजे नंदी (बैल) त्याने वाटेत मला ठोकरले म्हणून मी पडले आणि त्यामुळे - नदीचा पति

समुद्र, त्याचा रिपू म्हणजे शत्रू अगस्ती ऋषी - त्याचा तात म्हणजे घडा [कुंभ] फुटला. {अगस्तिऋषिंचा जन्म घड्यात झाला अशी

आख्यायिका आहे} आणि मी पडल्यामुळे - रविसुत - सुर्यपुत्र कर्ण [कान] महिसंगे म्हणजे भूमीवर पडल्यामुळे दुखावला.