महेश यांच्या प्रतिसादानंतर, स्वामीयोगेशांचे 'मी दूध प्यायले आहे' हे शंभर टक्के बरोबर आहे हे पटले असेलच. बोलीभाषेत किंवा हल्लीच्या लेखी भाषेत 'दूध पिले आहे' असे म्हटले तरी चालते.
अदितींनी योग्य लिहिले आहे, प्राणायाम ची(x) अशुद्ध आहे, प्राणायामाची असे हवे. त्यांना धन्यवाद! किंवा, त्यांचे आभार! (त्यांचे धन्यवाद किंवा त्यांना आभार नाही.) आभार मानतात, धन्यवाद हे आशीर्वादांप्रमाणे देतात, मानत नाहीत!