भूषण,
      श्रुंगाराची साहित्यात अभिव्यक्ती होताना एक लक्ष्मण रेषा पाळल्या जाणे आवश्यक असते असे माझे मत आहे, किंबहुना तसा संकेतच आहे, नाही का? आपण चांगले लिहू शकता, असे आपल्या गझला वाचून जाणवत असते.. प्रस्तुत गझलेतील 'आलम थोडा भिन्न' हा शेर पातळी सोडून खाली उतरला आहे, .. एका चांगल्या गझलेला गालबोट लागले, असे माझे स्पष्ट मत आहे. शिवाय ह्या शेरात अलामत भंगली आहे..आणि मतल्यात काफियाच नियम सुद्धा ... सगळ्या शेरात जी आणि आणि अलामत आ आहे, तर झी   कसे जुळेल
जादू नखरे मोहक विभ्रम मादक गंधा लेवुनि तू
झेलत झेलत आवेगांना पुनश्च ताजी ताजी हो.. उत्तम...
बाकी सगळे शेर छान आहेत..
-मानस६